सोरट्यात आरोग्यसेवेचा सेवाभावी उपक्रम; शंभरावर नागरिकांची मोफत तपासणी!

पलगाव प्रतिनिधी जय गुलालकर
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सोरटा येथे आयोजित करण्यात आलेले भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरात शंभरहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवत आरोग्य तपासणी करून घेतली. नवयुवक दुर्गा उत्सव मंडळ, सोरटा, सरस्वती नर्सिंग स्कूल आणि दीपसुधा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन
शिबिरात जनरल फिजिशियन डॉ. मिलिंद ठोंबरे, नेत्रतज्ज्ञ डॉ. जीवन तांबेकर आणि जनरल फिजिशियन डॉ. आरती बांथो यांनी उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी केली. गरजेनुसार नागरिकांना वैद्यकीय मार्गदर्शन व औषधोपचार करण्यात आले. मोफत आरोग्यसेवेचा लाभ मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

नर्सिंग विद्यार्थ्यांसह स्वयंसेवकांचे मोलाचे योगदान
शिबिर यशस्वी करण्यासाठी सरस्वती नर्सिंग स्कूलच्या GNM व ANM अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच शिक्षक नयन कांबळे आणि सागर इंगळे यांनी स्वयंसेवक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. नागरिकांची नोंदणी, तपासणीसाठी आवश्यक सहकार्य आणि शिबिराचे नियोजन यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले.