आमदार सुमित वानखेडे यांच्या तत्परतेतून ॲम्ब्युलन्स उपलब्ध; रुग्णसेवेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आर्वीकरांना आरोग्यसेवेची भेट!
आमदार सुमित वानखेडे यांच्या तत्परतेतून ॲम्ब्युलन्स उपलब्ध; रुग्णसेवेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल


आर्वी शहरातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आमदार सुमित वानखेडे यांनी आर्वीसाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आमदार सुमित वानखेडे यांच्या शुभहस्ते या ॲम्ब्युलन्सचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या या तत्पर प्रतिसादामुळे आर्वीकरांसाठी आरोग्यसेवेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध झाली आहे.


एका विनंतीला तत्काळ प्रतिसाद!
आर्वीसाठी ॲम्ब्युलन्सची आवश्यकता असल्याची बाब आमदार सुमित दादा वानखेडे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सकारात्मक प्रतिसाद दिला. केवळ मागणी ऐकून न घेता प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी आर्वीकरांच्या गरजेला प्राधान्य दिले. त्यांच्या या तत्परतेमुळे नागरिकांच्या सेवेसाठी ॲम्ब्युलन्स उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला.
संकटकाळात रुग्णांसाठी ठरणार जीवनदायी आधार!
अपघात, अचानक उद्भवणारी गंभीर आजारपणे किंवा अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला वेळेत रुग्णालयात पोहोचविणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी ॲम्ब्युलन्सची सुविधा अनेक रुग्णांसाठी आशेचा किरण ठरते. नव्याने उपलब्ध झालेल्या या सुविधेमुळे गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळण्यास हातभार लागणार असून, त्यांच्या कुटुंबीयांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.


दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर झालेल्या या उद्घाटनामुळे आर्वीकरांच्या सेवेत आणखी एक महत्त्वाची सुविधा दाखल झाली आहे. नागरिकांची गरज ओळखून तत्परतेने मदतीचा हात पुढे करणारे आमदार सुमित वानखेडे यांचे हे पाऊल आर्वीकरांसाठी दिलासादायक ठरत आहे.

यावेळी आमदार सुमित भाऊ वानखेडे, नगर अध्यक्ष स्वातीताई गुल्हाने, नगरसेवक गौरव जाजू, माजी नगरसेवक प्रकाश भाऊ गुल्हाने, भाजपा नेता राम निस्ताने, सुनील ठाकूर, विजयजी बाजपेयी, हुसेनी बोहरा व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *