प्रभाग क्रमांक ३ मध्ये आयुष्मान भारत व आभा कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक श्री. देविदासजी साठे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयुष्मान भारत कार्ड’ व ‘आभा (ABHA) कार्ड’ नोंदणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आयुष्मान भारत व आभा कार्डची नोंदणी करून घेत शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घेतला.
या शिबिराला नगरपरिषद पदाधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष श्री. गौरवभाऊ जाजू, पाणीपुरवठा सभापती श्री. अजयजी कटकमवार, शहराध्यक्ष श्री. राहुलजी गोडबोले, नगरसेवक श्री. लवेश गलोले, सौ. उषाताई सोनटक्के, सौ. संपदा जोशी, श्री. विशाल भारती, श्री. धनंजय घाटनासे, माजी सभापती श्री. प्रकाशजी गुल्हाने, श्री. रामभाऊ निस्ताने, श्री. देवा साठे, तसेच शासकीय आरोग्य मित्र आणि लाभार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत आणि आभा कार्ड योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशा जनहिताच्या शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
