विषारी चारा खाल्ल्याने ११ बकऱ्यांचा मृत्यू; पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान

विषारी चारा खाल्ल्याने ११ बकऱ्यांचा मृत्यू; पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान


 जगदीश कुर्डा कारंजा-घाडगे : तालुक्यातील जऊरवाडा  येथे विषारी चारा खाल्ल्याने तब्बल ११ बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संबंधित पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, ग्रामस्थांनी शासनाकडे तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जडूरवाडा येथील शेतकरी व पशुपालक उत्तम महादेवराव पाटील यांच्या ११ बकऱ्या नेहमीप्रमाणे जंगलात चरण्यासाठी गेल्या होत्या. चराईदरम्यान त्यांनी कथितपणे विषारी चारा किंवा विषारी वनस्पती खाल्ल्याने त्यांची प्रकृती अचानक बिघडली. काही वेळातच एकामागून एक अशा सर्व ११ बकऱ्यांचा मृत्यू झाला.


या घटनेची माहिती मिळताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. पशुपालक उत्तम पाटील यांनी सांगितले की, बकरीपालन हे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असून, एकाच वेळी ११ बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे या घटनेची सखोल चौकशी करून मृत बकऱ्यांचा पंचनामा करण्याची तसेच पशुपालकाला आपत्ती मदत किंवा पशुधन हानी योजनेअंतर्गत योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. यासोबतच जंगल परिसरातील विषारी वनस्पती अथवा इतर संभाव्य कारणांची तपासणी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *