आर्वीत मंदिर विश्वस्तांची बैठक उत्साहात; ९० हून अधिक विश्वस्तांची उपस्थिती

आर्वीत मंदिर विश्वस्तांची बैठक उत्साहात; ९० हून अधिक विश्वस्तांची उपस्थिती
मंदिर संस्कृतीचे रक्षण, देवस्थानांच्या जमिनींचे संरक्षण व संघटन मजबूत करण्याचा निर्धार


 आर्वी, दि. ९ ऑगस्ट २०२६
आर्वी तालुका मंदिर विश्वस्तांची बैठक श्री श्याम बाबा मंदिर, श्यामलिक धर्मशाळेजवळ, आर्वी येथे महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीला आर्वी तालुक्यासह परिसरातील ९० हून अधिक मंदिर विश्वस्तांची उपस्थिती होती.
मंदिर संस्कृतीचे रक्षण व संवर्धन, देवस्थानांच्या मालमत्ता व जमिनींचे संरक्षण, मंदिरांचे पारदर्शक व सक्षम व्यवस्थापन तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाशी प्रभावी समन्वय या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बदलत्या परिस्थितीत मंदिर संस्थानांसमोरील प्रशासकीय, कायदेशीर व जमीनविषयक प्रश्न सोडविण्यासाठी मंदिर विश्वस्तांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. देवस्थान इनाम जमिनींच्या नोंदी व संरक्षण, मंदिरांच्या मालमत्तेचे जतन तसेच मंदिरांच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला.
प्रत्येक मंदिराचे सुयोग्य, पारदर्शक व प्रभावी व्यवस्थापन, धार्मिक व सामाजिक उपक्रमांना चालना देणे आणि भाविक व नागरिकांचा सहभाग वाढविणे याबाबतही विचारमंथन झाले. आर्वी तालुक्यातील मंदिरांचे प्रश्न एकत्रितपणे शासनासमोर मांडण्यासाठी तसेच मंदिर संघटनेच्या पुढील कार्याची दिशा निश्चित करण्यासाठी विश्वस्तांनी विविध सूचना मांडल्या.
यावेळी श्री निलेश टवलारे (देवस्थान समिती), श्री कैलास पनपालिया (अध्यक्ष, नागेश्वर महादेव संस्थान, धामंत्री), श्री आशिष मारूडकर (सचिव, पिंगळा देवी संस्थान), श्री कैलास गिरोळकर (श्री महादेव संस्थान, चांदूर रेल्वे), श्री धनराज वेलणकर (श्री रघुनाथ महाराज संस्थान, गंगापूर-आर्वी), श्री सतीश ठाकरे (विश्वस्त, संत लहानुजी महाराज संस्थान, टाकरखेड), श्री दिलीप अग्रवाल (अध्यक्ष, श्री श्याम शक्ती समिती, आर्वी) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
बैठकीला विलास होनाडे (माऊली धाम, दिघी), प्रमोद भारती (दुर्गामाता मंदिर, तळेगाव), दिलीप झामडे (तेलाई माता देवस्थान, पांढुरणा), सुरेश नाथफासे (श्यामजी पंत देवस्थान, तळेगाव), पृथ्वीराज सोनी (विठ्ठल-रुक्मिणी व गणपती मंदिर, आर्वी), दर्शन पुरोहित (बालाजी मंदिर, आर्वी), विनायक दुर्गे (अवधूत मंदिर, तळेगाव), वसंता लोखंडे (अवधूत मंदिर, वर्धमनेरी), रामदास मिसले (हनुमान मंदिर, चिस्तूर), जीवन आसोडे (रघुनाथ महाराज मंदिर, आर्वी), अंकुश वानखडे (गजानन महाराज मंदिर, आर्वी), अशोक जिरापुरे (महादेव मंदिर, आर्वी), आशिष लोखंडे (संत बहिणाबाई मंदिर, जळगाव), रवींद्र भोयर, विजय करडे, मोहन इंगळे, भानुदास कडू, सुनील राऊत (विश्वशांती धाम, वाढोणा), स्वप्नील अग्रवाल, नरेश अग्रवाल, सतीश पाठक (दत्तात्रय देवस्थान, आर्वी), मोरेश्वर खेडकर (विश्वकर्मा मंदिर, कौंडण्यपूर), लक्ष्मीकांत साखरे (रामदेव बाबा संस्थान, आर्वी), अनिल जोशी (भगवंतराव महाराज, आर्वी), उत्तम येवले (पांडुरंग मंदिर, तळेगाव), रमेश तायवाडे (रघुनाथ महाराज मंदिर, आर्वी), मनोज काळे (गोरक्षनाथ मंदिर, अंबिकापूर), शामाबाई नरगावे (माताजी मंदिर, कावली वसाड), संजय पनपालिया (दाभाडा), विनोद कहारे (संत रघुनाथ महाराज संस्थान, आर्वी), मनोहर बानूबाकोडे (अध्यक्ष, संत नरहरी महाराज संस्थान, कोंडणपूर), जितेंद्र वांगे, सदानंद अहकर (संत सद्गुरु गजानन महाराज संस्थान, आर्वी), किशोर रानोडकर (श्री गुरुदत्तात्रय देवस्थान, आष्टी), सुभाषराव सलनकर (संत आबाजी महाराज देवस्थान, आर्वी), रामचंद्र सोनटक्के (आबाजी महाराज देवस्थान, वीरूळ) आदींसह तालुक्यातील विविध मंदिरांचे विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


“एक मंदिर – एक संघटन – एक दिशा” या संकल्पनेतून मंदिर संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. मंदिर विश्वस्त, अध्यक्ष, सचिव, पुजारी, सेवेकरी व धर्मप्रेमी नागरिकांनी एकत्रितपणे कार्य केल्यास मंदिरांच्या संरक्षण व विकासाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आर्वी तालुक्यातील मंदिरांच्या समस्या व विकासाच्या संधींचा आढावा घेऊन भविष्यात जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पातळीवर शासनासमोर हे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले.
बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र देवस्थान समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित सर्व मंदिर विश्वस्त, पदाधिकारी, पुजारी, सेवेकरी व धर्मप्रेमी नागरिकांचे समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *