खासदार अमर काळे यांचे खंदे समर्थक नरेश चापले यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
कारंजा तालुक्यात खासदार गटाला मोठा धक्का

जगदीश कुर्डा कारंजा घाडगे
तालुक्यातील खासदार अमर काळे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे नरेश चापले यांनी अमर काळे यांना रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला याचा भरपूर फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नरेश चापले हे तेली समाजाचे वजनदार नेता म्हणून त्यांची ओळख आहे यापूर्वीही ते ग्रामपंचायत सदस्य व नगरपंचायत चे सदस्य म्हणून निवडून आले होते
नरेश चापले हे पक्ष सोडणार आहे अशी चर्चा पुष्कळ दिवसापासून सुरू होती मिळालेल्या माहितीनुसार याबाबतीत खासदार अमर काळे यांनाही माहीत असल्याचे बोलले जाते परंतु त्यांचे समाधान करून त्यांचे काय म्हणणे आहे हे ऐकून घेतल्या गेले नाही
दिनांक नऊ ऑगस्ट रोजी कारंजा येथे चार कोटी रुपयाचे लोकार्पण सोहळा विधान परिषद सदस्य बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते करण्यात आले होते त्याच कार्यक्रमात नरेश चापले यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला
नरेश चापले शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती जेव्हा खासदार अमर काळे यांना मिळाली तेव्हा त्यांनी आठ ऑगस्ट रोजी चापले यांचे निवासस्थानी जाऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु आता वेळ निघून गेलेली आहे मी त्यांना शिवसेनेत प्रवेश घेण्याचा शब्द दिला असल्यामुळे मी आपला शब्द फिरवूशकत नाही असे स्पष्ट सांगितले
या प्रवेशामुळे खासदार गटाला येणाऱ्या नगरपंचायत च्या निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही