अतिक्रमणधारकांचे घरपट्टे नियमित करा; नगरसेविका मधुमाला दुधकवरे यांचे आमदार सुमित वानखेडे यांना निवेदन

अतिक्रमणधारकांचे घरपट्टे नियमित करा; नगरसेविका मधुमाला दुधकवरे यांचे आमदार सुमित वानखेडे यांना निवेदन

 जगदीश कुर्डा ​कारंजा –

कारंजा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक १७ मधील नागरिकांच्या प्रलंबित घरांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरसेविका मधुमाला दुधकवरे यांनी पुढाकार घेतला आहे. प्रभागातील अतिक्रमणधारकांचे घरपट्टे तातडीने नियमित करण्यात यावेत, या मागणीचे निवेदन त्यांनी आमदार सुमित वानखेडे यांना सादर केले.
​प्रभाग क्रमांक १७ मध्ये अनेक गरीब व गरजू कुटुंबे अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. मात्र, घरपट्टे नियमित नसल्याने या नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नगरसेविका दुधकवरे यांनी आमदार वानखेडे यांची भेट घेऊन चर्चा केली आणि घरपट्टे नियमितीकरणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. आमदार सुमित वानखेडे यांनीही या प्रश्नावर सकारात्मक भूमिका घेत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. निवेदन सादर करतेवेळी भाजप नेते शिरीष भांगे, रवी दुधकवरे, मदन वाढवे, दीपक चौघुले यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *