आर्वीत ‘विकसित भारत संकल्प यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
केंद्राच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत; जनसहभागातून विकसित भारताचा संकल्प

आर्वी येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रे’निमित्त आयोजित कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थितांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचे प्रेरणादायी उद्बोधन ऐकले.
यावेळी आमदार सुमित भाऊ वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून, शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे हीच विकसित भारताची खरी ताकद आहे,” असे मत आमदार सुमित भाऊ वानखेडे यांनी व्यक्त केले.

‘विकसित भारत’ हे केवळ स्वप्न नसून देशातील प्रत्येक नागरिकाच्या सहभागातून साकार होणारा संकल्प आहे. केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या संकल्प यात्रेच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे शासनाच्या योजना आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आर्वी नगराध्यक्ष स्वाती गुल्हाने, विधानसभा प्रमुख विजय वाजपेयी, आष्टी मंडळ अध्यक्ष अंकिता होले, कारंजा मंडळ अध्यक्ष चक्रधर डोंगरे, आर्वी मंडळ अध्यक्ष राजेंद्र ठाकरे, आर्वी शहराध्यक्ष राहुल गोडबोले यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
