मातृसेवा संघ शाखा आर्वीची वार्षिक आमसभा व आमदार निधीतून बांधलेल्या दालनाचे उद्घाटन संपन्न

मातृसेवा संघ शाखा आर्वीची वार्षिक आमसभा व आमदार निधीतून बांधलेल्या दालनाचे उद्घाटन संपन्न

मातृसेवा संघ शाखा, आर्वीची वार्षिक आमसभा तसेच आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या नव्या दालनाचे उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला माजी आमदार दादारावजी केचे, विद्यमान आमदार सुमितजी वानखडे, नगराध्यक्षा सौ. स्वातीताई गुल्हाने, नगरपालिकेचे उपाध्यक्ष गौरवभाऊ जाजू, मातृसेवा संघाच्या अध्यक्षा ॲड. अरुणाताई देशपांडे, सचिव सौ. ज्योतीताई भट, कविता जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर शाल व तुळशीच्या रोपांचे स्मृतिचिन्ह देऊन अतिथींचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात ॲड. अरुणाताई देशपांडे यांनी मातृसेवा संघाच्या संस्थापिका मा. कमलाताई यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या समाजसेवेचा प्रेरणादायी जीवनपट उलगडून सांगितला. आमदार सुमितजी वानखडे यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. माजी आमदार दादारावजी केचे यांनीही संस्थेच्या कार्याचे अभिनंदन करून आवश्यक त्या वेळी मदत करण्याची ग्वाही दिली.
नगराध्यक्षा सौ. स्वातीताई गुल्हाने यांनी नगरपालिकेमार्फत मातृसेवा संघाला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. उपाध्यक्ष गौरवभाऊ जाजू यांनीही संस्थेच्या सामाजिक उपक्रमांना पाठिंबा देण्याची भावना व्यक्त केली.
वार्षिक आमसभेत सचिव सौ. ज्योतीताई भट व कोषाध्यक्ष सौ. मायाताई देशपांडे यांनी विषयपत्रिकेतील विषयांचे क्रमवार वाचन केले. सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिवानी देशपांडे यांनी केले, तर उपाध्यक्षा सौ. शैलाताई देशपांडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगिता पांडे, जाजूताई, सौ. स्नेहल देशमुख, सौ. देवयानी देशपांडे, डॉ. पल्लवी खंडेलवाल, गणपतराव कालभूत, सुधाकरराव कुरवाडे, सौ. साधना कुरवाडे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती लाभली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *