विदर्भाची धन्यधरा आर्वी नगरीत भव्य चातुर्मासिक मंगल प्रवेश सोहळा; जैन समाजात उत्साहाचे वातावरण

विदर्भाची धन्यधरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आर्वी नगरीत यावर्षी जैन समाजासाठी अत्यंत मंगलमय असा भव्य चातुर्मासिक मंगल प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आषाढ शुद्ध दशमी, शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी या पवित्र चातुर्मासाला प्रारंभ होत असून, संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या चातुर्मासात मधुरभाषिणी पूज्य श्री मोक्षरत्ना श्रीजी महाराज साहेब (आदि ठाणा-२) यांच्या सान्निध्यात विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचने, स्वाध्याय व आध्यात्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांना पूज्य श्री हर्यक्षा श्रीजी महाराज साहेब यांची सुशिष्या म्हणून ओळखले जाते. तसेच या प्रसंगी जैन परंपरेतील महान साध्वींच्या प्रेरणादायी विचारांचा लाभ भाविकांना मिळणार आहे.

चातुर्मास काळात दररोज सकाळी ९.०० ते १०.०० या वेळेत जैन मंदिर उपाश्रय, आर्वी येथे प्रवचनांचे आयोजन करण्यात आले असून, धर्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्री जैन श्वेतांबर सुपार्श्वनाथ श्रीसंघ, आर्वी यांच्या वतीने करण्यात आले असून, आयोजनाच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. आर्वीसह परिसरातील जैन समाजामध्ये या चातुर्मासिक मंगल प्रवेशाबद्दल मोठा उत्साह असून, भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्म लाभ घ्यावा असे आवाहनचातुर्मास कमिटीचे गौतमचंदजी जैन, दिलीप चोरडिया,जयकुमारजी सखलेचा, नगिनचंदजी संकलचा, जीतू सकलेचा,सुशील लाठीवाला, चंद्रसिंहजी चोरड़िया, नेमीचंदजी सकलेचा,
प्रफुल्लकुमारजी सखलेचा, कुलदीप चोरड़िया यांनी केले आहे.
