आमदार सुमित वानखेडे यांच्या पाठपुराव्याला यश; प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत आर्वीतील २५८ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा निधी

आर्वी : आर्वी शहरातील शेकडो कुटुंबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत पात्र २५८ लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील निधीचे वितरण आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रतीकात्मक स्वरूपात धनादेश प्रदान करण्यात आले.
केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल व पात्र नागरिकांना स्वतःचे पक्के घर उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य देणारी महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जात असून, अनेक कुटुंबांच्या आयुष्यात नव्या आशेचा किरण निर्माण होत आहे.

आर्वी शहरातील पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आमदार सुमित वानखेडे यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, पहिल्या टप्प्यातील निधीचे वितरण झाल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडल्याने लाभार्थ्यांनी आमदार सुमित वानखेडे यांच्यासह केंद्र व राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्ष स्वातीताई गुल्हाने, उपाध्यक्ष गौरवजी जाजू, प्रशांतजी ठाकूर, जगनजी गाठे, शुभांगी गाठे, लवेश गलोले, देवीदासजी साठे, मनोजजी आगरकर, कांता कसर, संजयजी थोरात, संजयजी राऊत, भाजप शहराध्यक्ष राहुलजी गोडबोले, उर्मिला पवार, अरसलान खान, सुनीलजी वाजपेयी, संपदा जोशी, अजय कटकमवार, उषा सोनटक्के यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी प्रधानमंत्री आवास योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरकुलाच्या स्वप्नांना प्रत्यक्ष आकार मिळत असल्याची भावना व्यक्त केली. आर्वी शहरातील विकासकामांसोबतच सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार सुमित वानखेडे यांनी यावेळी सांगितले.
