कारंजा पोलिसांची मोठी कारवाई: चोरी गेलेली बोलेरो पिकअप मध्यप्रदेशमधून हस्तगत

जगदीश कुर्डा कारंजा (घा.):
पोलीस स्टेशन कारंजा (घा.) अंतर्गत तांत्रिक तपासाच्या व गोपनीय माहितीच्या जोरावर बाबाराव सोमकुवर यांच्या मालकीची चोरीला गेलेली बोलेरो पिकअप गाडी शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. अमोल शरदराव चित्रीव (वय ३८ वर्षे, रा. वार्ड क्र. १४, कारंजा घा.) यांनी पोलिसात तक्रार दिली की, कारंजा (घा.) येथील बिहाडी रोडवरील वॉटर फिल्टर जवळ उभी असलेली बोलेरो पिकअप अज्ञात isमाने चोरून नेली. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन कारंजा (घा.) येथे गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता.
तपास पथकाने तांत्रिक साधने, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवून मध्यप्रदेश येथील बैतुल येथे जाऊन कारवाई केली. या गुन्ह्यात आरोपी शुभम सीताराम चव्हान (वय २० वर्षे, रा. खारकल, ता. राजपूर, जि. बडवानी, म.प्र.) याला निष्पन्न करून चोरीस गेलेली बोलेरो पिकअप गाडी हस्तगत करण्यात आली आहे. सदर यशस्वी कार्यवाही पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सरीता चव्हान यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रल्हाद मदन, पोउपनी सतीश जायभाये, पो.हवा. अंकुश निचत, पो.अंम. दिनेश घसाड आणि आशिष कालोकार यांनी केली. या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून चोरीच्या गुन्ह्यांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.