साहित्य रत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती बोरगाव मेघे द्वारा
जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती कार्यक्रम

निलेश बंगाले तळेगाव शा पं प्रतिनिधी
दिनांक 1 ऑगस्ट स्थानिक बोरगाव मेघे येथे साहित्यरत्न , लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती कार्यक्रम थाटात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्सव समिती अध्यक्ष गुलाबरावजी डोंगरे, तर उद्घाटक म्हणून सरपंच संतोष भाऊ सेलुकर, मार्गदर्शक म्हणून तुषारभाऊ उमाळे संभाजी ब्रिगेड, जेष्ठ विचारवंत राजकुमार जाधव, समाजसेविका विद्याताई राइक्वार, प्रा.सर्वजितजी ताकतोडे, तर प्रमुख पाहुणे सामाजिक कार्यकर्ते सतीश गवळी,विठ्ठलराव काळे, राजुभाऊ शेजोळकर मारोती काळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मान्यवर मंडळीचे हस्ते लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करण्यात आले.
मान्यवर व मार्गदर्शक मंडळींनी आपले विचार व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हर अर्पण करून ढोल ताशाच्या गजरात आयोजन समितीच्या वतीने भव्य मिरवणूक व रथ यात्रा काढण्यात आली.
कार्यक्रमाचे यशस्विते करिता कमिटी अध्यक्ष गुलाबराव डोंगरे,उपाध्यक्ष मारोतराव डोंगरे, पिंटूभाऊ काळे,बाबाराव काळे, पंकज डोंगरे, राजु शेजोळकर,अभिजित बावणे,सुनील बावणे,निरंजन कांबळे,बाबाराव काळे,नितेश खंडाळे,गौरव शेजोळकर,रमेश वानखेडे,सतीश शेजोळकर,द्रौपदी वानखेडे,नितेश खंडारे,गजानन काळे,समीर तायडे,अंकुश काळे,साहिल वानखेडे,निलेश डोंगरे,सौरभ शेजोळकर, नितेश डोंगरे, बादल शेजोळकर,देवेंद्र पडघाणे,दिनेश पडघाण संदीप काळे,राजुभाऊ काळे, पुंडलिक काळे व इतर सर्व उत्सव समिती चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.