४ कोटींच्या विकासकामांचे भव्य लोकार्पण; निर्धार मेळावा, पक्षप्रवेश व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

४ कोटींच्या विकासकामांचे भव्य लोकार्पण; निर्धार मेळावा, पक्षप्रवेश व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जगदीश कुर्डा कारंजा( घा )

शिवसेनेच्या वतीने शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २ वाजता मन्नालाल  मातादीन धर्मशाळा, पोलीस स्टेशनजवळ, कारंजा (घा.) येथे ४ कोटी रुपयांच्या विकासकामांच्या भव्य लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना निर्धार मेळावा, भव्य पक्षप्रवेश व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळाही संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार बच्चूभाऊ कडू (विधान परिषद), आमदार सुमितभाऊ वानखेडे (आर्वी विधानसभा), आमदार मनीषाताई कायंदे (विधान परिषद) व शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरणभाऊ पांडव यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वातीताई गजानन भिलकर , अध्यक्षा नगरपंचायत कारंजा (घा.) राहणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून राज दीक्षित (संपर्कप्रमुख, वर्धा लोकसभा), नितीनभाऊ म. दर्यापूरकर (माजी उपाध्यक्ष, नगरपंचायत कारंजा व स्वीकृत सदस्य), प्रशांतजी शहागाडकर (जिल्हाप्रमुख, शिवसेना शिंदे गट) उपस्थित राहणार आहेत.
यावेळी भगवान बुवाडे , संजय मस्की , हेमंत तेजराव  बन्नगरे , कमलेश कठाणे, निताताई गो. मिश्रा, विशाल इंगळे, मधुमाला दुधकवरे, रंजनाताई ढबाले  आणि राजेंद्र लाडके यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे निमंत्रक नितीनभाऊ म. दयापुरकर असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *