जगदीश कुर्डा कारंजा घाडगे
कारंजा शहरात ४ कोटींच्या कामांचे लोकार्पण …
भव्य पक्ष प्रवेश सोहळा व गुणवंत विद्यार्थ्यां सत्कार

कारंजा (घा) – कारंजा शहरात ४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा गुणवंत विद्यार्थी सत्कार कारंजा नगरीत संपन्न झाला. निमित्याने शिवसेना पक्षाचे विदर्भ प्रमुख ,विधान परिषद आमदार मा बच्चूभाऊ कडू , मा आमदार मनीषाताई कायंदे , संघटन प्रमुख मा किरणभाऊ पांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
दिनांक ८ ऑगस्टला कारंजा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भव्यदिव्य निर्धार मेळावाचे आयोजन स्व मन्नालाल मातादिन अग्रवाल धर्मशाळा येथे पार पडला निमित्यने शहरातील ४ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले. सोबतच शहरातील १० वी व १२ वी च्या १२० गुणवंत विद्यार्थीचा सत्कार करण्यात आला. प्रामुख्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष श्री नरेश उर्फ गजूभाऊ चाफले माजी उपसरपंच श्री उमेशजी चाफले , सौ वैशाली उमेश चाफले , श्री अंकेश शेकार , दिलीप जांभळे व शेकडो कार्यकर्तेनी शिवसेना पक्षात प्रवेश केला.
सोबतच कारंजा शहराच्या धार्मिक क्षेत्रात अविरत भजन पूजनाच्या स्वरूपात सेवा देणाऱ्या २५ भजन मंडळींचे सत्कार करण्यात आला. कारंजात शहरातील विद्यार्थी यांचा सत्कार केला निमित्याने श्री बच्चूभाऊ कडू यांचे आयोजन सोबत विद्यार्थी यांचे तोंड भरून कौतुक केले. सोबतच भजन मंडळाच्या सत्कार वेळी सर्वांचे कौतुक केले कारंजा शहराच्या विकासाच्या दृष्टिकोन ठेऊन भव्य प्रशासकीय इमारत व क्रीडा संकुल व अन्य महत्त्वाचे विकास काम येणाऱ्या काळात पूर्ण करू आपण फक्त कारंजा शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभे राहा अशे आव्हान त्यांनी केले .
निमित्याने शिवसेना पक्षाचे विदर्भ प्रमुख ,विधान परिषद आमदार मा बच्चूभाऊ कडू , मा आमदार मनीषाताई कायंदे , संघटन प्रमुख मा किरणभाऊ पांडव , जिल्हाप्रमुख श्री प्रशांत शाहाडगाव लोकसभा संपर्क प्रमुख श्री राज दीक्षित , जिल्हाप्रमुख श्री राजेश सराफ ,नगराध्यक्षा सौ स्वातीताई भिलकर ,शिवसेना विधानसभा प्रमुख श्री नितिनभाऊ दर्यापूरकर ,नगरपंचायत उपाध्यक्ष भगवानजी बुवाडे , गट नेते श्री संजयजी मस्के , नगरसेवक श्री कमलेश कठाने , राजेंद्रजी लाडके , विशाल इंगळे , सौ नीताताई मिश्रा ,सौ मधुमाला दूधकवरे शहर अध्यक्ष सुजितभाऊ चौधरी , अनिल नांदने , पवन ढोले , अमित बंडे , आकाश मानकर , मनोज चरडे , सतीश इंगळे उपस्थित होते कार्येक्रमाचे सूत्र संचालन श्री पवनजी ठाकरे व हेमंत बन्नगरे व प्रास्ताविक शिवसेना नेते श्री नितिनजी दर्यापूरकर यांनी केले.