स्वातंत्र्य दिनानिमित्त आर्वीत भाजयुमोतर्फे भव्य सायकल रेस; युवकांचा उत्स्फूर्त सहभाग

स्वातंत्र्य दिनानिमित्त आर्वीत भाजयुमोतर्फे भव्य सायकल रेस; युवकांचा उत्स्फूर्त सहभाग


आर्वी : भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) आर्वी शहर व ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सायकल रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उत्साह, देशभक्ती आणि क्रीडा भावना यांचा सुंदर संगम या स्पर्धेत पाहायला मिळाला. युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सायकलिंगचा जोश दाखवून दिला.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या सायकल रेसमुळे आर्वी शहरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विविध भागांतून आलेल्या सायकलपटूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेदरम्यान युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उपस्थित नागरिकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण होते.
स्पर्धेत अमरावती येथील श्रीजल कोहळे यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले. वाशीम येथील राजेश जाधव यांनी द्वितीय क्रमांक, तर नागपूर येथील तेजस धांडे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या खेळाडूंना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.


या कार्यक्रमाला आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. सुमितदादा वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ स्वाती प्रकाश गुल्हाने, विजयजी बाजपेयी, प्रशांत ठाकूर, अनिल भाऊ जोशी,डॉक्टर अरुण पावडे, प्रकाश गुल्हाने, राम निस्ताने,उपाध्यक्ष व शिक्षण सभापती गौरव जाजू,भाजपा शहर अध्यक्ष राहुल गोडबोले ,पाणी पुरवठा सभापती अजय कटकमवार ,शिक्षण समितीचे सदस्य लवेश गलोले ,शुभांगी गाठे ,नगरसेवक मनोज आगरकर,देवीदासजी साठे ,नगरसेविका सौ उर्मिला पवार,सौ उषा सोनटक्के,सौ संपदा जोशी,मेहताब खातून युसुफ खान,सौ सारिका लोखंडे,सौ मनिषा बावणे,सामाजिक कार्यकर्ते अर्सलन खान,देवासाठे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार सुमित वानखेडे यांनी सायकल रेस स्पर्धेला उपस्थित राहून युवकांचा उत्साह वाढवला.
युवकांनी खेळ आणि आरोग्याला प्राधान्य देत अशा उपक्रमांत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम कौतुकास्पद असून, यातून फिटनेस आणि देशभक्तीचा संदेश मिळतो.सर्व सहभागी स्पर्धकांना त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.


यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवकांनी शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच क्रीडा क्षेत्रातही पुढे यावे, असा संदेश दिला. सायकलिंगमुळे आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि शिस्तीची भावना वाढीस लागते. त्यामुळे अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन सातत्याने होणे गरजेचे असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित या भव्य सायकल रेसने आर्वीतील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. देशभक्तीच्या वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे क्रीडा, आरोग्य आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा उपक्रम म्हणून भाजयुमोच्या सायकल रेसची शहरात चर्चा रंगली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *