आमदार सुमित वानखेडे यांच्या नेतृत्वावर विश्वास; कारंजात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

जगदीश कुर्डा कारंजा (घा.)–
आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुमितदादा वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासकामांवर विश्वास व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शिरीषजी भांगे यांच्या पुढाकाराने झालेल्या या पक्षप्रवेशात श्री. जगदीशजी चाफले, सौ. जयश्री चाफले, माजी उपसरपंच श्री. रमेशजी सरोदे, श्री. अमोल सरोदे तसेच माजी नगरसेविका सौ. कल्पनाताई सरोदे यांचा समावेश आहे. भाजपच्या विकासाभिमुख विचारधारेवर विश्वास व्यक्त करीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे कारंजा (घा.) परिसरात भाजपा संघटनेला नवी ऊर्जा आणि बळ मिळणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नव्याने पक्षात सहभागी झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे भाजपा परिवारात मनःपूर्वक स्वागत करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विकास, जनसेवा आणि संघटन विस्ताराचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. पक्ष संघटना अधिक मजबूत करून प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धारही करण्यात आला.

यावेळी विजयजी बाजपेयी, शिरीषजी भांगे, चक्रधरजी डोंगरे, हरिभाऊजी जसुतकर, किशोर भांगे, संजय कदम, दिलीप जसुतकर, प्रमोद चव्हाण, सुवर्णाताई चौधरी, ज्योतीताई यावले, रमाताई दुर्गे, वैशाली सरोदे, सुवर्णाताई कावडकर, मीनाक्षीताई भांगे, गजानन सरोदे, भूपेश बारंगे, सुधाकर दुर्गे, डॉ. रमेशजी भांगे, सुदीप भांगे, सुनील वंजारी, अजय कावडकर, घनश्याम मेघरे, मनोहर चाफले, राजेश काळबांडे, शैलेश घिमे, शेख निसार, रोशन मानमोडे, चेतन काळे, सुमित बारई, रजत वंजारी, मोरेश्वर सरोदे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.