आमदार सुमित वानखेडे यांच्या पुढाकाराने स्व. रामभाऊ भोयर यांच्या कुटुंबीयांना १० लाखांची शासकीय मदत

आष्टी: मौजा नरसिंगपूर येथील शेतात नागपंचमीची पूजा करण्यासाठी गेलेल्या स्व. रामभाऊ उदयभानजी भोयर यांचा दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुःखद घटनेनंतर आमदार सुमित वानखेडे यांनी पुढाकार घेत शासनाकडून मंजूर झालेली १० लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानुसार आज त्यांच्या कुटुंबीयांकडे १० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
आमदार सुमित वानखेडे यांनी भोयर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले असून, या कठीण प्रसंगी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्याच्या कुटुंबावर आलेल्या संकटात शासनाची मदत तातडीने मिळावी, यासाठी आमदार वानखेडे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे १० लाख रुपयांची शासकीय मदत धनादेशाच्या स्वरूपात कुटुंबीयांना मिळाली. या मदतीमुळे दुःखाची भरपाई होणार नसली तरी संकटाच्या काळात कुटुंबाला काही प्रमाणात आधार मिळणार आहे.
यावेळी भाजप आष्टी तालुका अध्यक्ष सौ. अंकिताताई होले, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. लांबाडे, श्री. अशोक विजयकर, ॲड. श्री. मनीष ठोंबरे, श्री. विलास चोहटकर, श्री. नरेंद्र भेनारकर, श्री. देवानंद डोळस, श्री. उत्तम बरगे, श्री. विजय खांडेकर, श्री. अक्षय राजुरकर, श्री. अतुल गुल्हाने, श्री. आवेज खान, श्री. नीरज भार्गव, श्री. सचिन नासरे, श्री. सागर सिनकर, श्री. अविनाश कदम, श्री. धनराज भोयर, श्री. सतीश बिजवे, श्री. गौरव गुल्हाने, श्री. चेतन तिवरकर, श्री. मंगेश शिरभाते, श्री. मोहन निंबोरकर, श्री. सुनील गांध्रे, श्री. दादाराव वानखेडे आणि श्री. शशिकांत बनसोड यांची उपस्थिती होती.
“स्व. रामभाऊ भोयर यांच्या दुर्दैवी निधनाने भोयर कुटुंबीयांवर मोठे दुःख कोसळले आहे. या कठीण प्रसंगी आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी असून, कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शासनाच्या माध्यमातून मिळणारी आवश्यक मदत आणि इतर बाबींसाठीही पुढील काळात पाठपुरावा करण्यात येईल,” अशी भावना आमदार सुमित वानखेडे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नरसिंगपूर परिसरात वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
