आर्वीत गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा भव्य सत्कार

आर्वीत गुणवंत विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा भव्य सत्कार


आर्वी : भारतीय जनता युवा मोर्चा (आर्वी शहर व ग्रामीण) आणि आर्वी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. सुमितभाऊ वानखेडे यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक व शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा शनिवार, दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय, आर्वी येथे उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच त्यांच्या यशामागे महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
कार्यक्रमाला मा. श्री. जयंतराव डेहनकर, मा. श्री. सुधाकरराव कोहळे, मा. श्री. सुधीरजी दिवे, मा. श्री. रामदासजी तडस, मा. श्री. सुरेशजी वाघमारे, मा. डॉ. वसंतराव गुल्हाने, नगराध्यक्ष स्वातीताई गुल्हाने,मा. श्री. विजयजी बाजपेयी, मा. श्री. राजेंद्रजी ठाकरे, मा. श्री. चक्रधरजी डोंगरे आणि मा. श्री. राहुलजी गोडबोले यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.


भाजपाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ निस्ताने यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामध्येआपल्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!आज तुम्ही नव्या वळणावर उभे आहात. आपल्या आवडीचे व क्षमतेला अनुरूप क्षेत्र निवडून कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वासाने त्यात प्राविण्य मिळवा. तुमच्यासमोर भविष्याचे विशाल आकाश खुले आहे; मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
मा. श्री. रामदासजी तडस यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना, “गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा केवळ पुरस्कार नसून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देणारा क्षण आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या यशातून कुटुंब, शाळा आणि आर्वीचे नाव उज्ज्वल करावे,” असे मनोगत व्यक्त केले.


तसेच मा. सुधीर जी दिवे यांनी शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करताना, “विद्यार्थ्यांच्या यशामागे त्यांच्या पालकांसोबतच शिक्षकांची मेहनत आणि मार्गदर्शन असते. शिक्षकांचा सन्मान म्हणजे शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा सन्मान आहे,” असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सभापती, नगरसेवक-नगरसेविका, भाजपचे कार्यकर्ते, विविध शाळांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि मोठ्या संख्येने गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या उमेदीने शिक्षण घेण्याची प्रेरणा निर्माण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *