माजी तालुकाध्यक्ष मोहन किनकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; कारंजा तालुकाप्रमुख पदाची मिळणार जबाबदारी

माजी तालुकाध्यक्ष मोहन किनकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; कारंजा तालुकाप्रमुख पदाची मिळणार जबाबदारी

​ जगदीश कुर्डा कारंजा (घाडगे):कारंजा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष तथा धडाडीचे युवानेते मोहन किनकर यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत हा पक्षप्रवेश पार पडला. पक्षात प्रवेश करताच मोहन किनकर यांच्याकडे लवकरच शिवसेना कारंजा तालुकाप्रमुख पदाची महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे.
​राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते उदयजी सामंत, विदर्भ संघटन प्रमुख किरणभाऊ पांडव, लोकसभा संपर्क प्रमुख राज दीक्षित, जिल्हाप्रमुख राजेश सराफ आणि आर्वी विधानसभा प्रमुख नितीनभाऊ दर्यापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी उपस्थित वरिष्ठ नेत्यांनी किनकर यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
​मोहन किनकर हे मागील अनेक वर्षांपासून स्थानिक राजकारणात आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. युवकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहणारा चेहरा म्हणून त्यांची तालुक्यात ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी संघटना मजबूत करण्यात मोठे योगदान दिले होते. याशिवाय त्यांनी कारंजा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत मोठे मताधिक्य मिळवले होते.
​या पक्षप्रवेश सोहळ्याला नगरसेवक संजय मस्के, नगरसेवक राजेंद्र लाडके, कमलेशजी कठाने, प्रवीण ढबाले, विशाल इंगळे यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहन किनकर यांच्याकडे तालुकाप्रमुख पदाची धुरा येणार असल्याने कारंजा तालुक्यात शिवसेनेची ताकद लक्षणीय वाढणार असून राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *