शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ॲड. शोभाताई काळे यांचा सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सन्मान

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ॲड. शोभाताई काळे यांचा सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सन्मान

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या नागपूर व अमरावती विभागीय अधिवेशनात भारत शिक्षण संस्था तथा कृषक शिक्षण संस्था आर्वीच्या अध्यक्षा ॲड. श्रीमती शोभाताई काळे यांचा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय व दीर्घकालीन कार्याबद्दल संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते जाहीर सन्मान करण्यात आला.


शिक्षण हे केवळ ज्ञानदानाचे माध्यम नसून समाजाच्या सर्वांगीण विकासाची पायाभरणी करणारे प्रभावी साधन आहे, या विचारातून ॲड. शोभाताई काळे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला, संस्कारांना आणि भविष्यातील वाटचालीला दिशा देण्यासाठी सातत्याने योगदान दिले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली भारत शिक्षण संस्था आर्वी आणि कृषक शिक्षण संस्था आर्वी यांनी शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, गुणवत्तावाढ, क्रीडा, सामाजिक बांधिलकी तसेच आधुनिक शिक्षणपद्धती यांचा समन्वय साधत संस्थांची शैक्षणिक वाटचाल सुरू आहे.


सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते झालेला हा सन्मान म्हणजे ॲड. शोभाताई काळे यांच्या शैक्षणिक कार्याची झालेली गौरवपूर्ण दखल असून, संस्थेच्या संपूर्ण परिवारासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण ठरला आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी, पालक व हितचिंतकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *