पर्युषण महापर्वानिमित्त मुनिसुव्रतनाथ मंदिरात भक्तिमय वातावरण

पर्युषण महापर्वानिमित्त मुनिसुव्रतनाथ मंदिरात भक्तिमय वातावरण
धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


 पुलगाव प्रतिनिधी जय गुलालकर 
पवित्र पर्युषण महापर्वानिमित्त पुलगाव  येथील श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वामुळे मंदिर परिसरात भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, जैन समाजातील महिला, पुरुष तसेच लहान मुले मोठ्या संख्येने धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत.
पर्युषण पर्वातील धार्मिक विधींना विशेष महत्त्व असून, दररोज सकाळी विधिनायक श्री मुनिसुव्रतनाथ भगवान यांची पक्षाल पूजा, अभिषेक व शांतिधारा करण्यात येत आहे. या धार्मिक विधींमध्ये भाविक श्रद्धेने सहभागी होऊन भगवान मुनिसुव्रतनाथ यांचे दर्शन घेत धर्मलाभ घेत आहेत.


पर्युषण महापर्वाच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमध्ये लहान मुलांचाही उत्स्फूर्त सहभाग दिसून येत असून, त्यांच्यामध्ये धार्मिक संस्कार रुजविण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे.
पर्युषण पर्वामुळे श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढली आहे. सकाळच्या धार्मिक विधींपासून विविध कार्यक्रमांपर्यंत मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.


पर्युषण महापर्वातून संयम, आत्मचिंतन, क्षमा आणि अहिंसेचा संदेश देत जैन समाज बांधव मोठ्या श्रद्धेने या पवित्र पर्वात सहभागी होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *