चंद्रशेखर गणपती मंडळाला खासदार अमर काळे यांची सदिच्छा भेट

चंद्रशेखर गणपती मंडळाला खासदार अमर काळे यांची सदिच्छा भेट
युवकांशी मनमोकळा संवाद; गणेशोत्सवाच्या आयोजनाचे केले कौतुक


पुलगाव : प्रतिनिधी जय गुलालकर 
तेलघाणी, पुलगाव येथील लोकप्रिय चंद्रशेखर गणपती मंडळाला खासदार अमर भाऊ काळे यांनी सदिच्छा भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंडळातील युवकांशी मनमोकळा संवाद साधत गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत विविध विषयांवर चर्चा केली.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती खासदार अमर काळे यांनी जाणून घेतली. युवकांचा उत्साह, एकजूट तसेच सामाजिक उपक्रमांप्रती असलेली सकारात्मक भावना यांचे त्यांनी कौतुक केले.
यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार अमर काळे यांचे स्वागत केले. गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा, संस्कृती आणि बंधुभाव वाढविण्याचा उत्सव असून, युवकांनी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी खासदार अमर काळे यांनी चंद्रशेखर गणपती मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या भेटीमुळे मंडळातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *