Al चा गैरवापर बनावट वृत्तपत्राच्या नावाने प्रमोशनल बातम्यांचा सुळसुळाट
अशा लोकांवर अंकुश लावण्याची मागणी,

जगदीश कुर्डा कारंजा घाडगे
सध्या सोशल मीडियाचे युग आहे कुत्रीम बुद्धिमत्ता अर्थात ये आयal तंत्रज्ञानाचा गैरवापर करून स्वतःचे प्रमोशन करण्याचे होड लागलीआहे ज्या उत्त पत्राचे नाव कधी ऐकले नाही किंवा अस्तित्वात नसलेल्या वर्तमानपत्राचे बनावट मास्टर हेड म्हणजे नाव आणि लोगो तयार करून अनेक लोक स्वतःची बातमी प्रसिद्ध झाल्याचे भासवत आहे भारत सरकारच्या रजिस्टर ऑफ न्यूज पेपर्स फॉर इंडिया, अधिकृत नोंदणी नसतानाही केवळ काही मिनिटातच ए आय टूल च्या मदतीने हुबेहू वृत्तपत्रासारखे कात्रन तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहे या वाढत्या अप प्रवृत्ती मुळे पत्रकारितेचे पावित्र्य धोक्यात आले आहे शासनाने अशा डिजिटल गैरप्रकारावर तातडीने कडक निर्बंध घालावे अशी मागणी आता बुद्धिवाद्याकडून जोर धरू लागली आहे
वाढत्या तंत्रज्ञानाच्या सोबतच राजकीय कार्यकर्ते, स्वयंभू नेते, आणि सर्वसाधारण कार्यकर्ते ये आईने तयार केलेल्या जनतेत स्वतःचा खोटा प्रभाव पाडण्याकरिता या तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत आहे कोणत्याही प्रतिष्ठित वृत्तपत्राचे स्वरूप किंवा काल्पनिक वृत्तपत्राचे लेआउट तयार करून त्यावर स्वतःचा फोटो आणि जीवनात न केलेल्या कामाबाबत अतिशय योक्ती मचकूर टाकून, माझी बातमी पेपरला आली, असा भ्रम निर्माण केल्या जात आहे करिता सामान्य माणसाची दिशाभूल करणाऱ्या या प्रकाराला सध्या मोठे उदान आले आहे वृत्तपत्र चालवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक नियमांची नोंदणी, प्रक्रियेचे आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे आचारसंहितेचे पालन करावे लागते
परंतु याच माध्यमातून घरबसल्या कोणताही भामटा संपादककिंवा पत्रकार असल्याचाआव आणत असल्याने अधिकृत वृत्तपत्राची विश्वसनीयता व पत्रकारितेचे महत्व धोक्याचे असल्याचे चिन्ह दिसून येत आहे अशा गंभीर बाबीची दाखल घेऊन ये आय जनरेट सामग्रीवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात यावी जर यावर लवकरात लवकर कारवाई केल्या गेली नाही तर वृत्तपत्रासोबतच वृत्तपत्र क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनाही येणाऱ्या काळात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे करिता शासनाच्या कायद्याप्रमाणे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या वर कडककारवाई करावी अशी मागणी समाजातील सर्वसाधारण लोकही आता करू लागले आहे आता हे पहावे लागेल की शासन यावर कोणत्या पद्धतीने व कशी कारवाई करते याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे