कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी कोरडा नाही तर कमीत कमी ओला दुष्काळ तरी जाहीर करा

जगदीश कुर्डा कारंजा घाडगे
कारंजा तालुक्यात पावसाचे सरासरी पर्जन्यमान 667 मिलिमीटर असून यंदा आतापर्यंत 546किलोमीटर पावसाची झोन झाली आहे म्हणजे सरासरी 81 टक्के पाऊस तालुक्यात झाला आहे ट्रिगर एक निश्चित करताना सरासरी पर्जन्य मानाचा अंदाज घेतल्या जातो कारंजा तालुका या यादीत येऊ न शकला नसल्याचे सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे कारंजा तालुक्याचे सरासरी प्रजन्यमान जिल्ह्यातील अनेक तालुक्यापेक्षा कमी आहे त्यामुळे तुलनात्मक दृष्ट्या कमी पाऊस होऊन सुद्धा केवळ सरासरी पर्जन्यमा नाच्या आधारामुळे तालुका ट्रिगर एक पासून वंचित राहण्याचा मुद्दा पुढे आला आहे
कारंजा तालुक्यालाच लागून आष्टी तालुका व दुसरीकडे यास तालुक्याला लागून काटोल तालुका या सगळ्या भागात जर पाऊस कमी झाला तर मग एकट्या कारंजा तालुक्यातच पाणी जास्त झाल्याचा अंदाज कसा काढला गेला यावरच जनता आपला आक्रोश व्यक्त करीत आहे
जर कारंजा तालुक्यात पाऊस जास्त झाला असा अंदाज जर असेल तर मग कारंजा तालुक्याला कोरड्या दुष्काळा ऐवजी ओला दुष्काळ जरी जाहीर करावा अशी आता मागणी काही शेतकऱ्याकडून होत आहे कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेता जनप्रतिनिधी आमदार महोदय व खासदार यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष घालून कारंजा जनतेला न्याय देण्याचे करावे येथे विशेष म्हणजे आमदार आणि खासदार हे आरवी तालुक्यातलेच जनप्रतिनिधी असल्यामुळे जनतेला न्याय मिळण्याची अपेक्षा आह
याच मागणीच्या समर्थनात एक आक्टोंबर पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमर काळे हे नारा टी पॉईंट वर रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे या रास्ता रोको ला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी समर्थन देण्याचे आवाहन केले जात आहे
दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून आर्वी विभाग प्रमुख नितीन दर्यापूरकर यांनी येत्या दोन-चार दिवसात आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची घोषणा केली आहे

त्याचप्रमाणे जयकुमार बेलखडे यांनी महाराष्ट्र शासनाला जर लवकरात लवकर कारंजा तालुक्यावर झालेला अन्याय दूर केला नाही तर मोठ्या आंदोलनाची चेतावनी एका पत्रकात दिली आहे
एकंदरीत पाहता तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत चालला आहे करिता शासनाने जनतेची भावना पाहता लवकरात लवकर कारंजा तालुक्याला न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे
शेतकरी सतीश भांदर्गे यांनी शासनाला विनंती केली आहे की कोरडा दुष्काळ नाहीतर ओला दुष्काळ तरी जाहीर करा