पावसातील खंडामुळे कारंज्यात दुष्काळसदृश्य स्थिती; ट्रिगर-१ मध्ये समावेशासाठी आमदार वानखेडेंची महसूलमंत्र्यांकडे मागणी

पावसातील खंडामुळे कारंज्यात दुष्काळसदृश्य स्थिती; ट्रिगर-१ मध्ये समावेशासाठी आमदार वानखेडेंची महसूलमंत्र्यांकडे मागणी


 जगदीश कुर्डा कारंजा : प्रतिनिधी
आर्वी विधानसभा मतदारसंघातील कारंजा तालुक्यात यंदा पावसातील मोठ्या खंडामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कारंजा तालुक्याचा ट्रिगर-१ मध्ये समावेश करावा, अशी मागणी आमदार सुमित भाऊ वानखेडे यांनी राज्याचे महसूल मंत्री मा. ना. चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे केली.
कारंजा तालुक्यात जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत पर्जन्यमान अत्यल्प झाले आहे. त्यातच तालुक्यातील मोठ्या प्रमाणावरील हलकी व डोंगराळ जमीन तसेच कमी जलधारण क्षमता यामुळे पावसातील खंडाचा पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पिकांची वाढ खुंटली असून, शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार सुमित भाऊ वानखेडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन कारंजा तालुक्यातील वास्तविक पर्जन्यमान, भौगोलिक परिस्थिती आणि पिकांवरील परिणाम याबाबत सविस्तर माहिती दिली. तालुक्यातील वस्तुस्थितीचा गांभीर्याने विचार करून ट्रिगर-१ मध्ये समावेशासह शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत व दिलासा मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या अडचणी शासनाच्या निदर्शनास आणून देत त्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आमदार वानखेडे यांनी यावेळी सांगितले.


यावेळी कारंजा तालुका अध्यक्ष चक्रधर डोंगरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सरिताताई गाखरे, भारत कोरडे, सुरेश खवशी, दिनेश चौधरी, ज्ञानेश्वर भुयार, विजय डोबले, देवेंद्र नासरे, प्रवीण श्रीराव, सतीश पठाडे, श्रावण मरसकोल्हे, सुरेश कालोकार, रामदासजी गळहाट, नारायण कडवे, विजय मानमोडे, अतुल खवशी, रेवताताई धोटे, रंजनाताई टिपले, निताताई गजाम, रोषणीताई ढोबाळे, कपिल खवशी, विष्णू धंडाळे, धिरज कसारे, सुरज गिऱ्हाळे, विजय गाखरे, अजय धामणकर, अमोल घागरे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *