दुष्काळाच्या यादीतून कारंजा तालुका वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट कारंज्यातील शेतकऱ्यांशी दुजाभाव का ?

दुष्काळाच्या यादीतून कारंजा तालुका वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
कारंज्यातील शेतकऱ्यांशी दुजाभाव का ?
खासदार अमर काळे यांच्या नेतृत्वात एक ऑगस्टला महाविकास आघाडीचा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन
 जगदीश कुर्डा कारंजा (घाडगे).
अल्प पर्जन्यमानामुळे कारंजा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे खरीप पिके संकटात सापडली. राज्य शासनाने २६५ तालुक्यात दुष्काळी परिस्थिती जाहीर केली असताना वर्धा जिल्ह्यातील ७ तालुक्यांचा समावेश करण्यात आला. मात्र कारंजा तालुक्याला या यादीतून वगळण्यात आल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
*प्रतिक्रिया*
यंदा पावसाने सुरुवातीपासूनच हुलकावणी दिल्याने सोयाबीन, कापूस, तूर यांसह प्रमुख खरीप पिकांची वाढ खुंटली. सोयाबीनची अवस्था पोचट झाली असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण झाली आहे. बियाणे, खते, मशागत व इतर खर्चासाठी शेतकऱ्यांनी हेक्टरी हजारो रुपये खर्च केले, मात्र पिकांना पुरेसे पाणी न मिळाल्याने उत्पादनाच्या आशा मावळल्या आहेत. अल्प पावसाचा परिणाम भूजल पातळीवरही झाला असून विहिरींची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खाली गेलेली आहे
सोयाबीनच्या शेंगा पोचट झाल्या आहे. त्यातील दाणे भरलेले नाहीत. त्यामुळे सोयाबीनचे उत्पादन घटणार आहे. शासनाने कारंजा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याऐवजी कारंजा तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळणे ही या तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय करणारी बाब आहे. – प्रवीण गवड शेतकरी बेलगाव

*प्रतिक्रिया*
खर्च होऊन गेला. पाऊस नसल्यामुळे पिकांची वाढ खुटलेली आहे. सोयाबीन भरलेले नाही. काढलेले कर्ज कसे फेडावे आणि कुटुंब कसे चालवावे हा फार मोठा सरकारने गंभीर प्रश्न आमच्यापुढे निर्माण झाला आहे तरी कारंजा तालुका दुष्काळग्रस्त च्या यादीत लवकरात लवकर समाविष्ट करावा
स्वप्निल खवशी अध्यक्ष सरपंच संघटना कारंजा
पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शासनाने तातडीने कारंजा तालुक्याची प्रत्यक्ष पाहणी करून
कारंजा तालुका जिल्हा मध्ये सर्वात जास्त मागासलेला आहे. पावसाचे प्रमाण कमी आहे. विहिरीला पाणी नाही. कमी पावसामुळे ७५ टक्के संत्रा गळ झाली, सोयाबीन, कपाशीचे पीकपण चांगले नाही कारंजा तालुक्याची परिस्थिती गंभीर झालेली आहे.
दुष्काळग्रस्त तालुका म्हणून घोषणा करावी, अशी मागणी होत आहे. तसेच बँका व वित्तीय संस्थांच्या कर्जवसुलीला स्थगिती, बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी
66 वळून पावसाचे पाणी या तालुक्यातून पाहिजे तसे वाहून गेले नाही. त्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. मेघराजा कायमथाच कोपला. झालेला खर्च फार मोठा आहे. मायबाप सरकारने काहितरी पदरात टाकायला पाहिजे होते, पण दुष्काळ यादीतून तालुका वगळले,
सोयाबीनला शेंगा आल्यावर पावसाने दगा दिला, त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्या नाही. उत्पादन खर्च करून उत्पादन होईल याची आशा नाही. शासनाने मदत करावी अशी आमची अपेक्षा असताना कारंजा तालुक्याला दुष्काळग्रस्ताच्या यादीतून वगळणे हे कारंजा तालुक्यातील शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. तसेच येत्या एक ऑक्टोंबर ला अकरा वाजता कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने येऊन खासदार अमर काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहेत तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन माजी पंचायत समिती सदस्य टीकाराम घागरे यांनी केलेले आहे
सरसकट भरीव नुकसानभरपाई आणि कृषी पंपांच्या वीज बिलात संपूर्ण माफी द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे

प्रवीण गवड

बेलगाव चे सरपंच स्वप्निल खवशी

 पावसाळा सुरू झाला तेव्हापासून पावसाचे पाणी शेताच्या बाहेर निघाले नाही तसेच वाहूनही गेले नाही त्यामुळे भूतो ना भविष्य अशी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे मेघ राजा कायमचा कोपला असे म्हणायला हरकत नाही शेतीवर केलेला खर्च हा फार मोठा आहे ज्यांना आम्ही मायबाप सरकार म्हणतो त्यांनी अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची दोन्ही हात खुलून मदत करावी व दुष्काळाच्या सावटात असलेल्या कारंजा तालुक्याला दुष्काळी यादीत सामील करावे


प्रमोद चव्हाण शेतकरी व सामाजिक कार्यकर्ता

 एक आक्टोंबर ला नारा टी पॉईंटवर महाराष्ट्र शासनाच्या विरोधात चक्काजाम आंदोलन अमर काळे यांचे नेतृत्वात करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने हजर राहून महाराष्ट्र सरकारला आपली शक्ती दाखवण्याची आव्हान माझी पंचायत समिती सदस्य तुकाराम जी घागरे यांनी आवाहन केले आहे


 श्री टीकाराम जी घागरे
माजी पंचायत समिति सदस्य


विभाकर ढोले शेतकरी
 कारंजा तालुक्यात कमी पर्जन्यमान झाले सोयाबीनच्या शेंगा पोचट आहे त्यातील दाणे सुद्धा पूर्णपणे भरलेले नाही त्यामुळे सोयाबीन उत्पादनात भरपूर घट येण्याची भीती कास्तकारांना सतावत आहे
कारंजा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करणे ऐवजी त्याला दुष्काळाचे यादीतून वगळणे ही खरोखर शेतकऱ्यांची थट्टा नाही तर काय म्हणावे

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *